Devendra Fadnavis: 'माझेही नाव पुरस्कारांच्या यादीत टाका..!' पुण्यातील बेकायदा फ्लेक्स विरोधी मोहिमेवर CM फडणवीस खूश; नेत्यांना कानपिचक्या

Pune Anti-Hoarding Drive: ‘उद्या माझ्या नावाचेही बेकायदा होर्डिंग लागले, तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,’ अशी मिश्किल टिप्पणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या बेकायदा होर्डिंग्ज विरोधी मोहिमेचे कौतुक केले आहे. रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

esakal

Updated on: 

Pune: पुणे महापालिका प्रशासनाकडून सध्या शहरातील अतिक्रमणे, बेकायदा फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात धडाक्यात कारवाई सुरू आहे. पुणे महापालिकेच्या या मोहिमेचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कौतुक केले आहे. या कारवाईसाठी त्यांनी महापालिकेचे अभिनंदन करतानाच ‘उद्या माझ्या नावाचेही बेकायदा होर्डिंग लागले तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा’ अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Loading content, please wait...