#Holi2020 : खबरदार.. होळीसाठी झाडे तोडल्यास तुरुंगवास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

होळीसाठी झाडाची फांदी तोडताना आढळल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 हजार रुपयापर्यंतचा दंड भरावा लागणार आहे.

मुंबई : होळीसाठी झाडाची फांदी तोडताना आढळल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 हजार रुपयापर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत झाडे तोडणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अगदी स्वत:च्या घरासमोरील झाड तोडल्यासही महापालिका कारवाई करणार आहे. 

महत्वाची बातमी ः #Holi2020 : या होळीत 'अशी' घ्या लहानग्यांची काळजी...

सोमवारी होणाऱ्या होळीसाठी वृक्षतोड होण्याची शक्‍यता आहे. वृक्ष प्राधिकरण कायद्यानुसार, बेकायदा वृक्षतोडीसाठी 1 आठवड्यापासून 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि 1 हजारापासून 5 हजारांपर्यंतचा दंडाची तरतूद आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पुढील दोन दिवस वृक्ष तोडीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. झाड तोडताना आढळल्यास संबंधीत व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 

महत्वाची बातमी ः आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा ? 'असा'...

मुंबईतील झाडे 
मुंबईत 29 लाख 75 हजार 283 झाडे असून त्यातील 15 लाख 63 हजार 701 झाडे ही खासगी आवारांमध्ये आहेत; तर 11 लाख 25 हजार 182 झाडे ही सरकारी आवारांमध्ये आहेत. तसेच 1 लाख 85 हजार 33 झाडे रस्त्याच्या कडेला असून 1 लाख 1 हजार 67 झाडे उद्यानात आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punishment for tree cutting on holi