कर्वेनगर विलगिकरण केंद्रातील धक्कादायक प्रकार, पॉझिटिव्ह रुग्णांना मिळतंय 'असं' जेवण...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

विक्रोळी, काजूरमार्ग आणि भांडुपमधील कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या कर्वेनगर विलगिकरण केंद्रात खराब नाश्ता आणि जेवणामुळे रुग्णांची उपासमार होत आहे. 

मुंबई : विक्रोळी, काजूरमार्ग आणि भांडुपमधील कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या कर्वेनगर विलगिकरण केंद्रात खराब नाश्ता आणि जेवणामुळे रुग्णांची उपासमार होत आहे. कर्वेनगर विलगिकरण केंद्र हे कांजूरमार्ग आणि विक्रोळीच्या मध्यभागी आहे. त्यामुळे भांडुप ते विक्रोळी दरम्यान बाधित होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांसाठी ते सोयीचे आहे. या केंद्रात जेवणाचा पुरवठा करण्याचे काम पालिकेने एका कॅटरर्सला दिले आहे. मात्र या ठिकाणी जेवण आणि नाश्ता येईपर्यंत तो खराब होतो. त्यामुळे ते जेवण खाण्यालायक राहात नाही.

आधीच कोरोनाची बाधा त्यात निकृष्ठ जेवण आणि नाश्ता, त्यामुळे आजार बरा होण्याऐवजी वाढू शकतो अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत. वारंवार तक्रारी करूनही त्याची पालिका प्रशासन दाखल घेत नसल्याचे त्या विलगिकरण कक्षातील रुगणांचे म्हणणे आहे. 

BIG NEWS - आता समजणार किती जणांना कोरोना होऊन गेलाय, कारण आता होणार 'ही' अत्यंत महत्त्वाची टेस्ट...

कर्वेनगर विलगिकरण कक्षात डॉक्टर वारंवार बदलत असतात. पालिकेचे शिक्षक या केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेले असतात. येथे जबाबदार कोणीही नाही. त्यामुळे या सेंटरमधील 260 रुग्णांचे हाल होत आहेत. 

रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या निकृष्ठ नाश्ता आणि जेवणाबाबत मनसेचे स्थानिक विभागाध्यक्ष जयंत दांडेकर, उपविभागाध्यक्ष विश्वजित ढोलम, उपशाखाध्यक्ष निलेश साळवी यांनीही वस्तुस्थिती जाणून घेतली. रुग्णांच्या जीवाशी पालिका प्रशासनाने खेळू नये असा इशारा मनसेने दिला आहे. रुग्णांना जेवण चांगल्या दर्जाचे मिळत नसून कंत्राटदार आणि कॅटरर्स यांचे खिसे भरले जात आहेत काय असा सवाल त्यांनी पालिका प्रशासनाला केला आहे. 

quality of food seared in karvenagar quarantine center is not upto the mark says patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quality of food seared in karvenagar quarantine center is not upto the mark says patients