Thane News : राहुल गांधींच्या स्वागताचे जिजाऊ संस्थेने लावले फलक; फलकावर अवतरले महाविकास आघाडीचे नेते

'भारत जोडो न्याय यात्रे'च्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आले आहेत. त्याअनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
Rahul Gandhi Banner
Rahul Gandhi Bannersakal

ठाणे - 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आले आहेत. त्याअनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. असे असताना, सगळ्यांचे लक्ष वेधले ते भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या फलकांनी.

जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच या फलकावर चक्क महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आल्याने सांबरे हे महाविकास आघाडीच्या तिकिटावर भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार का अशी चर्चा या निमित्ताने रंगू लागली.

गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन या ठिकाणी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे निवडून आले आणि तेव्हापासून या परिसरात भाजपाची ताकद वाढताना दिसत आहे.

ह्या मतदार संघावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्यात शुक्रवारी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी लोकसभा मतदार संघातून जाणार आहे. या यात्रेमुळे भिवंडीतील काँगेसला आलेली मरगळ झटकून पुन्हा उभारी मिळेल अशी आशा स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

असे असतानाच, या यात्रेच्या मार्गावर म्हणजेच वाडा, कुडूस तसेच अन्य भागात सांबरे यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. यानिमित्ताने सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण या माध्यमांतून सर्वसामान्य घटकांनाही चांगले जीवनमान मिळावे, समाजातल्या शेवटच्या घटकांचा विकास व्हावा या हेतूने निलेश सांबरे यांनी प्रबळ इच्छाशक्तीतून २००८ साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. गेल्या दोन वर्षांपासून ते भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com