esakal | कल्याणमध्ये हुक्का पार्लरवर छापा; कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये हुक्का पार्लरवर छापा; कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाची कारवाई

मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरातही हुक्का पार्लरचे वेड तरुणाईला झिंगवत आहे. कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.

कल्याणमध्ये हुक्का पार्लरवर छापा; कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाची कारवाई

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज


डोंबिवली - मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरातही हुक्का पार्लरचे वेड तरुणाईला झिंगवत आहे. कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. यावेळी अनेक तरुण तरुणी पार्लरमध्ये नशेत धुंद असल्याचे आढळून आले. खडकपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 79 जणांना  ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाने दिली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

संचारबंदीतही सुरु होते पार्लर 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी तसेच कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत याठिकाणी चस्का कॅफेच्या आड हुक्का पार्लर सुरु होते. याविषयीची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. पार्लरमध्ये अनेक तरुण तरुणी नशेत धुंद असल्याचे चित्र आतमध्ये दिसून आले. याप्रकरणी येथील ग्राहकांसह संबंधित कॅफेमालक, कर्मचारी असे एकूण 79 जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली.

घरी बसलेल्या महाराष्ट्राच्या वाघाला घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे...! भातखळकर यांच्याकडून राऊतांची खिल्ली 

मुंबई, ठाणे पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली शहरात बहुतांश हायप्रोफाईल भागात खुलेआम हुक्का पार्लर सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. तरुण तरुणींच्या त्याकडे वाढणारा कल पहाता अनेक नागरिकांनीही स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलिस प्रशासन यांना याची माहिती दिली आहे. परंतू कोठेही धडक कारवाई होताना दिसत नसल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. तरुणाई वाईट मार्गावर वळण्याआधीच याला आवर घालणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

Raid on hookah parlor in Kalyan Action of Welfare Crime Investigation Department

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top