
Mangao News: मुंबई-गोवा महामार्गावर वावेदिवाळी गावच्या हद्दीत शनिवारी (ता. २८) दुपारी १२च्या सुमारास भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.
राजाराम अनंता धारदेवकर (वय ६५, रा. रोहा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी माणगाव पोलिसांत नोंद झाली असून, कारचालकाला ताब्यात घेतले आहे.