देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 27 तास मृत्यूशी झुंज देत होत्या मेहरुन्निसा; इमारतीच्या ढिगाऱ्याखालून जवानांनी काढलं सुखरूप बाहेर

सुनिल पाटकर
Tuesday, 25 August 2020

मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीस जिवंत बाहेर काढण्यास एनडीआरएफ च्या जवानांना यश आले आहे.

महाड - शहरातील तारीक गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी शोध कार्याला वेग आला असून आत्तापर्यंत तेरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे तर चार वर्षाचा एक मुलगा गुखरूप जिवंत काढण्यात आला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी  महाराष्ट्र पोलीस ठाण्यामध्ये  पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीस जिवंत बाहेर काढण्यास एनडीआरएफ च्या जवानांना यश आले आहे.

महाड दुर्घटना टळली असती; बांधकाम व्यावसायिकाच्या दुर्लक्षामुळे हकनाक बळी

मंगळवारी ( ता.25) रोजी देखील तब्बल 26 तासांपासून शोध व बचाव मोहीम एनडीआरएफ टीम कडून सुरू असताना एक व्यक्ती जिवंत असल्याचे आढळून आले. इमारतीच्या  कोसळलेल्या स्लॅबखाली ही व्यक्ती दिसून आले आहे. डॉक्टरांच्या मदतीने त्या महिलेला शुद्धीवर आणून एनडीआरएफच्या जवानांनी काळजीपूर्वक बाहेर काढायचा प्रयत्न केला. सदर महिलेचे नाव मेहरुन्निसा अब्दुल हमीद काझी असून तिला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारतीच्या जीन्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या सापडल्या आहेत. मेहरुन्निसा सुखरूप असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे . त्यांना जवळच्या रानडे रूग्णालयात दाखल केले आहे

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Building Collapse Mehrunnisa was battling death for a staggering 27 hours; The soldiers pulled him out safely from under the pile of the building