रायगडच्या शास्त्रज्ञाचा अमेरिकेत बोलबाला 

अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पाली ः अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये नुकतीच सत्तरावी आंतरराष्ट्रीय अंतराळवीर कॉंग्रेस परिषद झाली. यामध्ये जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. उल्लेखनीय बाब अशी की यात रायगड जिल्ह्यातील अलिबागचे सुपुत्र नासा ह्युमन रिसर्च प्रोजेक्‍टचे शास्त्रज्ञ प्रणीत पाटील यांचा सहभाग होता. या परिषदेत शास्त्रज्ञ प्रणीत पाटील यांच्या Patil-kurkure equation of extreme space habitability या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. त्यांनी तयार केलेल्या समीकरणाला अधिकृत मान्यताही मिळाली. त्यांनी परग्रहावरील मानवाला राहण्यासाठी केलेल्या संशोधनाचे जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास करणार आहेत. 

प्रणीत पाटील आणि रिंकेश कुरकुरे यांनी फ्रॅक्‍टल अनालिसीस किंवा गणितीय आकलनाने टायटनचे उदाहरण घेऊन अंतराळातील पदार्थाचे विविध कार्य आणि रचना समजून घेणे. तसेच काही सूक्ष्म जिवाणू अन्य ग्रहांच्या परिस्थितीत जगण्यायोग्य आहेत की नाही हे समजण्याचा प्रयत्न. या दोन प्रकल्पावर संशोधन केले. 
प्रस्तुत प्रकल्पात नव्या पृथ्वीसम ग्रहावर पर्यावरणीय संशोधन आणि जनुकांच्या हालचालींवरच्या अभ्यासाचा समावेश आहे.

आपल्या पृथ्वीवर "टार्डीगेड' नावाचा एक सुक्ष्मजीव आढळतो. ज्याच्याकडे मरणावस्थेत जाऊन पुनःच्छ जिवंत होण्याची क्षमता आहे. या जीवातील पोषके जर का मानवी जनुकामध्ये एकत्रीकरण करता आले तर मानवाला इतर ग्रहावर वास्तव्यायोग्य करता येऊ शकते, असे संशोधन प्रणीत पाटील यांनी त्यांच्या प्रकल्पात मांडले. यात प्रणित पाटील यांचे सहयोगी शास्त्रज्ञ रिंकेश कुरकुरे यांनी विविध ग्रहावर परिमाण काय असेल याचेही मूल्यमापन यात नमूद केले आहे. संशोधनाचे सादरीकरण मेघ ठाकूर आणि सुचेशना पाटील यांनी केले. 

ह्युमन स्पेस एक्‍स्प्लोरेशन हे विश्‍वातील आपले स्थान आणि आपल्या सौर मालिकेच्या इतिहासाबद्दल मूलभूत प्रश्‍न सोडवण्यास मदत करते. आव्हानांचा सामना करून आपण तंत्रज्ञान वाढवितो. नवीन उद्योग तयार करतो आणि इतर राहण्यायोग्य ग्रहांवर परिस्थितीचे आकलन करतो. कुतूहल आणि शोध मानवी अस्तित्वास महत्त्वपूर्ण आहेत. अंतराळात सखोल जाण्याचे आव्हान स्वीकारल्यास जगातील नागरिकांना आणि उद्याच्या पिढ्यांना या रोमांचक प्रवासावर अंतराळ अन्वेषणात नक्कीच सामील होता येईल. 
- प्रणीत पाटील, शास्त्रज्ञ, नासा ह्युमन रिसर्च प्रोजेक्‍ट 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue