मुरूडमध्ये जल्लोष... 

मुरूडमध्ये जल्लोष...
मुरूडमध्ये जल्लोष...
Updated on

मुरूडः सिनेकलावंतांची नृत्य अदाकारी, नवतरुणांचा जल्लोष आणि आकर्षक विद्युत रोषणाईत येथील पर्यटन महोत्सवात नववर्षाचा जल्लोष करण्यात आला. 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील समुद्रकिनारी उभारलेल्या भव्य रंगमंचावर उतरलेल्या सिनेविश्‍वातील तारकांनी "न्यू इयर कल्ला' या सांगीतिक कार्यक्रमात 20 हजारांहून अधिक रसिकांवर अधिराज्य गाजविले.
 
अलिबाग, रोहा, तळा तालुक्‍याकडून मुरूडकडे मंगळवारी (ता. 31) संध्याकाळपासूनच मोटारींचे ताफेच्या ताफे धुरळा उडवित समुद्राकडे धाव घेतली. अडीच किलोमीटरचा बीच जनसागराने फुलून गेला. सनसेटचा देखावा टिपण्यासाठी शेकडो मोबाईल मावळतीकडे सज्ज होते. काही पर्यटक घोडागाडी, बोटिंगमध्ये गर्क होते. फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून उभारलेल्या स्टॉलवर खवय्यांनी ताव मारला. नृत्यांगणांच्या कलेला दाद देत किनाऱ्यावर हौशी मंडळींनी बेभान होऊन नृत्याविष्कार सादर केला.

दुसरीकडे मध्यरात्री 12 च्या ठोक्‍याला नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी हजारो पर्यटकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याखेरीज आकाशपाळणा, धावती ट्रेन, विविध खेळांचा बच्चे कंपनीने मनमुराद आनंद लुटला. उत्तररात्रीपर्यंत हौशी मंडळी मुरूड किनाऱ्यावर महोत्सवाचा आनंद घेत होते. त्यामध्ये काही विदेशी पर्यटकांचाही सहभाग होता. अनेक पर्यटक दर वर्षी महोत्सवाला हजेरी लावतात म्हणूनच मुरूडचा महोत्सव सर्वांचे आकर्षण बनला आहे. 

नेत्रदीपक रोषणाई 
मध्यरात्री 12 च्या ठोक्‍याला समुद्रकिनारी पर्यटकांनी एकच जल्लोष केला. या वेळी पालिकेतर्फे विविधरंगी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. 2020 कोरलेली रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरले. रोषणाईचे दृश्‍य कॅमेराबद्ध करण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली. फटाक्‍यांची आतषबाजी आणि रसिकांचा जल्लोष यामुळे समुद्रकिनारा दणाणून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com