खोपोलीतील नाट्यप्रेमींसाठी खूशखबर...

 शाहू महाराज नाट्यगृह
शाहू महाराज नाट्यगृह

खोपोलीः शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह व सामाजिक भवनाची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे आश्‍वासन नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनी रविवारी (ता. 26) येथे दिले. तसेच पालिकेकडून वाढविण्यात आलेल्या भाडेवाढीमध्येही कपात करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दैनिक "सकाळ'ने नाट्यगृह दुरवस्थेबाबत बातमी प्रसिद्ध केली होती.

येत्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव मांडण्यात येणार आहे. दुरुस्तीसाठी विशेष प्रस्तावानुसार आवश्‍यक निधीला मंजुरी तसेच भाडेवाढीमध्ये तातडीने कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या. पालिकेकडून सद्यस्थितीत व्यावसायिक नाट्यप्रयोग किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 20 हजार, राजकीय किंवा खासगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी 15 हजार तसेच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमासाठी 10 हजार अशी भाडेआकारणी करण्यात येते. या भाडेवाढीला मागील दीड वर्षापासून विरोध होत होता. नगराध्यक्षांच्या घोषणेनंतर ही भाडेवाढ कपात होऊन ती आता सर्वच कार्यक्रमांसाठी 10 हजार व व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठी 12 ते 15 हजार होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नाट्यगृहामधील दुरवस्था व गैरसोईंबाबत तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्यात येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com