esakal | 'केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत जगत आहे'; कॉंग्रेसनेत्याची घणाघाती टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत जगत आहे'; कॉंग्रेसनेत्याची घणाघाती टीका

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

'केंद्र सरकार सत्तेच्या मस्तीत जगत आहे'; कॉंग्रेसनेत्याची घणाघाती टीका

sakal_logo
By
अनिल पाटील

खोपोली -  माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या 92 व्या जयंती निमित्ताने खोपोलीत रायगड जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप व प्रदेश काँग्रेसचे  मुख्य प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. यावेळी माणिकराव जगताप यांनी बॅरिस्टर अंतुले  यांच्या रायगड, कोकण प्रदेश व राज्य आणि देश स्तरावरील कार्याला उजाळा दिला. तसेच रायगड जिल्ह्यात काँग्रेस दुय्यम स्थानी नाही तर पूर्वी प्रमाणे प्रथम स्थानावर आणण्याचा संकल्प केला.

'राज्यात काँग्रेस मजबूत आहे .आगामी दिवसात कोकणातही मजबूत होईल .मोदींच्या नेतृत्वाखाली देशात लोकशाही ला पायदळी तुडवणारे सत्ता केंद्र बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहांची अमित शहा मुख्य सत्ता केंद्र बनले असून , सत्तेचा गैरवापर, लोकभावनाचा अनादर सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन आशा प्रमुख समस्यांकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, सत्तेच्या मस्तीत जगत आहे.मात्र जनतेला समजले असून, याचा जाब काँग्रेस च्या सोबत जनता विचारीत आहे'. मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच रायगडसह संपूर्ण कोकणात काँग्रेसला पूर्वीसारखी शक्ती देऊन सामान्य जनतेच्या पहिल्या पसंतीचा राजकीय पक्ष बनविण्याचे आवाहन केले.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कामगार नेते महेंद्र घरत, महिला जिल्हाध्यक्षा श्रध्दा ठाकूर यांनीही या वेळी आपले विचार व्यक्त करून पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्याला लागण्याचे आवाहन केले. या मेळाव्याला  खालापूर पंचायत समिती माजी सभापती तथा विदयमान सदस्या कांचन पारांगे, जिल्हा उपाध्यक्षा दिपाली म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, प्रदेश सचिव अशोक मुंढे, सरचिटणीस महेंद्र ठाकूर, कर्जत तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष प्रथमेश पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे ,इंटक अध्यक्ष आमिर खान, जेष्ठ नेते अनंता पाटील, रोहा तालुकाध्यक्ष निजामभाई सय्यद, जिल्हा सरचिटणीस रामशेठ घरत, उरण तालुकाध्यक्ष जे.डी.जोशी, पेण तालुकाध्यक्ष हिराजी पाटील आदि सह कर्जत मतदारसंघ व रायगड जिल्ह्यातील सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन , युवक अध्यक्ष संदेश धावरे , महिला अध्यक्ष रेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व सेलच्या पदाधिकर्यांनी मेहनत घेतली.  सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत खोपोली शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी केले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

raigad khopoli political marathi news Inflation, Unemployment, Farmers protest criticizes sachin sawant politics updates