esakal | ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर}

महाड येथील चवदार तळ्याला डॉ. आंबेडकर यांचे लाखो अनुयायी दरवर्षी भेट देतात. त्यापैकी अनेक जण तळ्याचे पाणी घेऊन जातात. परंतु येथील पाण्यात शेवाळ असल्याने ते शुद्ध करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते

mumbai
ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
sakal_logo
By
सुनिल पाटकर

महाड  : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणी शुद्ध करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाड पालिकेला यासाठी एक कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. 

महाड शहराचा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेसाठी सत्याग्रह केला होता. त्यामुळे या तळ्याला विशेष महत्त्व आहे. या तळ्याला डॉ. आंबेडकर यांचे लाखो अनुयायी दरवर्षी भेट देतात. त्यापैकी अनेक जण तळ्याचे पाणी घेऊन जातात. परंतु येथील पाण्यात शेवाळ असल्याने ते शुद्ध करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते. यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने तळ्यासाठी एक कोटी 39 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली होती. परंतु हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर हा निधी आपल्याकडे मिळावा अशी मागणी सामाजिक विभागाकडे केली होती. नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी तत्कालीन सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. अखेर त्याला यश आले असून पालिकेची मागणी मान्य करत राज्य सरकारने चवदार तळे पाणी शुद्धीकरणाचा निधी नगरपालिकेकडे वर्ग केला आहे. त्यामुळे एक कोटी 39 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहेत. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तळ्याच्या मध्यभागी पाण्याखाली पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवली जाणार आहे. ती सौरऊर्जेवर चालणारी असेल. जैवविविधतेला पोषक असे हे पाणी शुद्धीकरण करण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदारावर प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्ती पाच वर्षे जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प योग्य तऱ्हेने कार्यान्वित राहील, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे. 

चवदार तळे पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी महाड पालिकेने एक कोटी 39 लाखाच्या निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा मंजूर होताच याठिकाणी काम सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प असेल. 
- सुहास कांबळे,
नगर अभियंता, महाड पालिका 

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

raigad marathi latest news One crore 39 lakh sanctioned chavdar tale mahad mumbai update