कर्जमुक्तीचे पैसे तीन दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

म्हसळा तालुक्‍यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 11 बॅंकांच्या माध्यमातून अपलोड झालेली एकूण खाती 521 आहेत. प्रसिद्ध झालेली खाती 356 आहेत. आधार प्रमाणिकरणाचे काम झालेली खाती 217 आहेत.

म्हसळाः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. म्हसळा तालुक्‍यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, आज चार दिवस उलटून केवळ 61 टक्के कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण केल्याचे नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांनी सांगितले. येत्या तीन दिवसांत कर्ज खात्यावर रक्‍कम जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सज्ज
 
म्हसळा तालुक्‍यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 11 बॅंकांच्या माध्यमातून अपलोड झालेली एकूण खाती 521 आहेत. प्रसिद्ध झालेली खाती 356 आहेत. आधार प्रमाणिकरणाचे काम झालेली खाती 217 आहेत. फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंर्तगत ज्या शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणिकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाली आहेत, त्यांनी यादीतील नमूद विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बचत खाते पासबुक घेऊन जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्र, बॅंक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करणे आवश्‍यक आहे. 

मागच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले. या वेळी फक्त अंगठा दिला आणि काम झाले. या वेळची प्रक्रिया अगदी सुटसुटीत आहे. 
- महादेव भिकू पाटील, शेतकरी, निगडी-म्हसळा 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 25 शेतकरी कामानिमित्त मुंबईत असतात. होळीच्या सुटीत शेतकरी गावी आल्यावर पूर्तता होईल. ई-सेवा केंद्राच्या समन्वयाने बॅंक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत समन्वय साधावा. आधार प्रमाणिकरण करून घेणे जरूरीचे आहे. 
- के. टी. भिंगारे, निवासी नायब तहसीलदार, म्हसळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad-Mhasala-Loan amount is credited to the farmers

टॉपिकस
Topic Tags: