Raigad : कॅशलेस व्यवहारांची चलती

रायगडमध्ये ६० टक्के नागरिकांचा प्रतिसाद
Cashless
Cashlesssakal

अलिबाग : नोट बंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात आले. यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याचे चांगले परिणाम तीन वर्षांनंतर रायगड जिल्ह्यात दिसू लागले असून ‘कॅशलेस’ व्यवहारांचे लोण आता ग्रामीण भागातील लहान-लहान दुकानांतही पोहचले दिसते. गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम अॅपच्या माध्यमातून ही सेवा पोहचली आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीनुसार, जिल्ह्यात ६० टक्के व्यवहार कॅशलेस होत आहेत.

एक कप चहापासून कपडे, घरगुती सामान खरेदी, सगळेच व्यवहार पूर्वी रोखीने होत. काही ठिकाणी आठ दिवस अथवा महिनाभराच्या उधारीवर व्यवहार होत. नोदबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना वेगाने सुरुवात झाली. वेगवेगळ्या वस्तू खरेदीपासून सरकारी कामकाजही ‘कॅशलेस’ वाढले. मोठ-मोठ्या दुकानांमध्ये ‘स्वॅब मशीन’ आल्या. आता तर मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहारांना चालना मिळाली. जिल्ह्यात तीन वर्षांपासून गुगल पे, फोन पे, पे टीएमद्वारे आर्थिक व्यवहाराला सुरुवात झाली. सुरुवातीला शहरापुरतेच हे व्यवहार मर्यादित होते; परंतु हळूहळू हे व्यवहार ग्रामीण भागातही सुरू झाले. चहाची टपरी, घडाळ्याचे दुकान, दूध विक्रेते, व्यायामशाळा अशा सगळ्या ठिकाणी मोबाईलमधून हे आर्थिक व्यवहार होत आहेत. तरुण पिढी या व्यवहाराकडे अधिक आकर्षित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे तब्बल ६० टक्के व्यवहार कॅशलेस होत आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना साथ सुरू होण्याच्या अगोदरपासून म्हणजे तीन वर्षांपासून ‘कॅशलेस’ व्यवहार सुरू झाले होते. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागले. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोबाईलद्वारे आता फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून खरेदी होते. ही पद्धत चांगली आहे.

- सागर जाधव, अलिबाग

पूर्वी रोख व्यवहार होते. त्यामुळे अनेकदा उधारी मोठ्या प्रमाणात होती. गेल्या अडीच वर्षांपासून एटीएम कार्ड, गुगल पे, फोन पे आदींद्वारे आर्थिक व्यवहार होऊ लागले आहेत. चहापासून जेवणाचे पैसे आता ऑनलाईनद्वारे थेट खात्यात जमा होऊ लागले आहेत. तरुण पिढीकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- रामभाऊ गोरीवले, हॉटेल व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com