Raigad News : आवक घटल्‍याने केळीच्या दरात वाढ

हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पूजनीय मानले गेले आहे.
keli
kelisakal

पनवेल - मागणीच्या तुलनेत बाजारात केळीची आवक कमी असल्‍याने दर वाढले आहेत. पाच दिवसांत केळीच्या दरात प्रति डझन १० ते १५ रुपयांची वाढ झाली असून ६० ते ८० रुपये डझनपर्यंत भाव वाढले आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पूजनीय मानले गेले आहे. केळीचे झाड त्यापैकीच एक. पूजेच्या वेळी केळीचे फळ, देठ आणि पाने वापरतात. दररोजच्या आहारात केळीचे सेवन केल्‍यास आरोग्‍य उत्तम राहत असल्‍याचा सल्‍ला डॉक्टरांकडूनही दिला जातो.

बारमाही उपलब्ध असलेल्या केळीला सणासुदीत मागणी वाढते. सध्या जळगाव, गुजरात, आणि मध्य प्रदेशातून केळीची आवक घटली असून तमिळनाडूमधून आवक होत आहे. नोव्हेंबरमध्ये नियमित आवक सुरू होईल. स्थानिक बाजारात केळीला ३,३०० ते ४,४०० रुपये प्रतिक्विंटलचा दरअसल्याचे पनवेलमधील केळीच्या व्यापाऱ्याने सांगितले.

keli
Ganesh Utsav 2023: “देवाला आवडणारा आवाज”, उत्कर्षने आजोबा प्रल्हाद शिंदेंचा दूर्मिळ व्हिडीओ सांगून जागवली आठवण

जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळीची आवक होते, मात्र गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केळीची लागवड कमी झाली आहे. त्‍यामुळे उत्‍पादनही परिणाम झाला आहे. सणउत्‍सवांमुळे केळ्यांची मागणी वाढली आहे, त्‍यामुळे दरही वाढले आहेत.

बाजारातही केळीला उठाव आहे. मात्र, आवक कमी होत आहे. त्यामुळे केळीच्या दरात वाढ झाली आहे. आणखी महिनाभर केळीचे दर चढेच असतील.

करिम शेख, फळ विक्रेता

keli
Beed News :विद्यार्थी गणवेशाचा घेतलेला निधी सरकारकडून सुपूर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com