Raigad : फार्महाऊस जवळील ओढ्यात रस्सी मध्ये अडकलेल्या आठ फूट मगरीला जीवदान Raigad stuck Forest Department team grabbed Shitafi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Forest Department team

Raigad : फार्महाऊस जवळील ओढ्यात रस्सी मध्ये अडकलेल्या आठ फूट मगरीला जीवदान

पाली : मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील इंदापूर गावाजवळील नगरोली येथील अजय मोरे त्यांच्या फार्महाऊस च्या शेजारी असलेल्या ओढ्यात एक तब्बल 8 फुटी मगर नायलॉनच्या रस्सी मध्ये गुरुवारी (ता.23) अडकली होती. या मगरीला वन्यजीव संरक्षक टीमने वन विभागाच्या मदतीने शिताफीने पकडून रात्री सुरक्षित अधिवासात सोडून दिले.

ओढ्यात एक मगर रस्सी मध्ये अडकलेली दिसल्यावर अजय मोरे यांनी ताबडतोब कोलाड येथील वन्यजीव संरक्षक सागर दहिंबेकर यांना संपर्क साधला. सागर लगेच त्यांच्या टीमला घेऊन घटनास्थळी पोहोचले. मगरीला रेस्क्यू करण्याआधी सागर यांनी स्थानिक वन विभाग कार्यालयाला संपर्क केला.

इंदापूर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार मगरीचा आकार हे पाच ते सहा फूट सांगण्यात आला होता. परंतु जागेवर गेल्यानंतर निदर्शनात आले की मगरीचा आकार आठ फुट आहे.

सागर यांनी लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. त्या आधी व्युव्हरचना केली व सर्वांनी मगरीला शिताफीने पकडले. आणि नायलॉनच्या रस्सीमध्ये अडकलेल्या मगरीची सुटका केली. या रेस्क्यूला जवळपास अर्धा तासाचा कालावधी लागला. वन विभागाच्या मदतीने मगरीला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

मगरीला रेस्क्यू करण्यासाठी सागर दहिंबेकर, निलेश लोखंडे, सुरज दहीवडेकर, श्वेता विश्वकर्मा, संदेश यादव, नीरज म्हात्रे व सचिन सानप आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

येथील काळ नदीमध्ये मगर आढळतात. पावसाळ्यात नदीला खूप पाणी आल्यावर मोठ्या मगर बाहेर पडतात व आजूबाजूच्या ओढे व नाल्यांकडे स्थलांतरित होतात. येथील पाणी कमी झाल्यावर पुन्हा नदीकडे मार्गक्रमण करतात.

या मगरीच्या बाबतीत सुद्धा असे झाले असावे. मात्र यावेळी ओढ्यातील नायलॉनच्या रस्सीच्या झुबक्यामध्ये ती अडकली. ही रस्सी भाज्यांच्या मांडवाला वापरतात ती होती. आणि झाडाला अडकलेली असल्याने मगर अडकून पडली होती. सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नव्हती.

सागर दहिंबेकर, वन्यजीव संरक्षक, कोलाड