Raigad Rain News: शेतकऱ्यांवर ‘अवकाळी’ संकट ; संपामुळे पंचनाम्‍यास विलंब

केवळ चार दिवसात आंबा पिकाचे ४० टक्के नुकसान झाले आहे.
आंबा
आंबाsakal

Raigad Rain News : दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा, काजूचा मोहर गळून पडला तर पांढरा कांदा भुईसपाट झाला.

पांढरा कांदा आणि हापूस आंबा हे रायगड जिल्ह्यातील मुख्य रब्बी पिके असून बदलत्‍या हवामानामुळे दोन पिके मोठ्या प्रमाणात बाधित झाल्‍याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

केवळ चार दिवसात आंबा पिकाचे ४० टक्के नुकसान झाले आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे झाडावर शिल्लक राहिलेल्या फळांचा दर्जा खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा हापूसचे उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते. मात्र यंदा आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १५,१६ मार्च रोजी आलेल्या

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग या किनारपट्टीवरील तालुक्यांसह माणगाव, तळा, रोहा, पेण तालुक्यांना बसला.

काढणीस तयार झालेल्या पांढरा कांदाही पावसामुळे आडवा झाला. अलिबागमधील पांढरा कांद्या आरोग्‍यदायी असल्‍याने मोठी मागणी असते. त्‍यामुळे कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. मात्र अवकाळीने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

तळा (बातमीदार) : जिल्‍ह्यात सध्या ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्‍तावले आहेत. तळा तालुक्यात भाजीपाला, कडधान्य, कलिंगड आणि आंबा, काजू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्‍यात भात हे एकमेव मुख्य पीक असताना तरुण वर्ग कष्टाच्या जोरावर भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, कारली, त्याचबरोबर अनेक पिके घेत आहेत. मात्र अवकाळीच्या संकटात शेतकरी भरडला जात आहे. नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

वीटभट्टी मालक धास्तावले!

पावसामुळे वीटभट्टीमालकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तापमान वाढल्‍याने भट्ट्या तयार करण्याचे काम जोमात सुरू होते. त्‍यामुळे वीजभट्टी परिसरात मजुरांची लगबग सुरू होती. मात्र पावसामुळे काम पूर्णतः थांबले आहे. पावसापासून संरक्षणासाठी काही ठिकाणी ताडपत्री टाकून तयार विटा नुकसानीपासून वाचवण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.

यंदा उशिराने थंडीला सुरुवात झाल्याने आंबा, काजूच्या पिकांना उशिराने फळधारणा सुरू झाली होती. त्यामुळे यंदाचा हापूस हंगाम लांबेल, असे गृहित धरून शेतकरी झाडांची निगा राखत होते.

मात्र अवकाळीने सर्व मेहनत वाया गेली. यात ४० टक्के फळे गळून गेली आहेत. ढगाळ वातावरणाचाही परिणाम होणार असल्याने आंबा बागायतदारांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

- भाऊ डिके, आंबा बागायतदार, रोहा

अलिबाग तालुक्यात अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे पांढरा कांदा भुईसपाट झाला आहे. कांद्याची पात कुजल्‍याने वाढ खुंटली आहे.

या पात्यांचा वापर कांद्याच्या माळी विणण्यासाठी केला जातो. व्यवस्थित विणलेल्या माळांना चांगली किंमत येते, तर सुट्या कांद्याला तुलनेने कमी किंमत मिळते.

- मधुकर थळे, कांदा उत्पादक, वाडगाव

आंबा
Mumbai News : लालबाग हत्या प्रकरणात काळाचौकी पोलिसांच्या तपासात नवनविन माहिती उघडकीस

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी फळगळती झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या, एकट्या तळा तालुक्यात १८ हेक्टर क्षेत्रातील आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली आहे मात्र संपामुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकलेले नाही.

- आनंद कांबळे, विभागीय कृषी अधिकारी-माणगाव

आंबा
Kolhapur : आदमापूर येथे जागरानिमित्त भाकणूक ; लाखो भाविकांना महाप्रसादाचा लाभ

साधारण ३०० ते ४०० हेक्टर आंबा बागायतींचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पर्यायी व्यवस्था करून संबंधित नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना केल्‍या आहेत.

- पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com