कोरोना रुग्णांचा मोठा आधार; अलिबागच्या ‘छोटमशेट’ यांनी घेतला समाजसेवेचा वसा

महेंद्र दुसार ः सकाळ वृत्तसेवा
Dilip bhoir
Dilip bhoirsakal media

अलिबाग : रायगडच्या कानाकोपऱ्यातून जिल्हा रुग्णालयात (civil hospital) आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्याने आठवण होते ती ‘छोटमशेट’ यांची. त्यांनी कधी कोणाला नाव विचारले नाही की कोणाची जात वा पक्ष... रुग्णालयात आलेल्या प्रत्येकाला चांगल्यात चांगली आरोग्य सुविधा (Good Health Facility) कशी मिळेल, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. साधारण दीड-एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोनाचा कहर (corona pandemic) सुरू झाला आणि रुग्ण वाढू लागले तेव्हापासून ‘छोटमशेट’ अर्थात रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर (Dilip Bhoir) यांची दररोजची धडपड सुरू आहे. त्यांची हीच धडपड कोरोना काळात अनेकांना मोठा आधार देऊन गेली.

Dilip bhoir
मानखुर्द : १०८ किलो गांजा जप्त; दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

छोटमशेट यांची रुग्णसेवा कोरोना संकटकाळात सकाळपासूनच सुरू होत होती. रुग्णांची आपुलकीने विचारपूस करणे आणि त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करण्यापासून या माणसाने स्मशानात चितेला अग्नी देण्याचेही काम केले. प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणाऱ्या भोईर यांनी कधीच स्वतःची पाठ थोपटून घेतली नाही. जिल्हाभरातून येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतः जातीने हजर राहून मदत केली.

सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेणे, त्यांना हव्या त्या वस्तू आणून देणे आणि बरे झाल्यानंतर घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात ते आघाडीवर होते. जिल्हा परिषदेच्या मापगाव मतदारसंघातून दिलीप भोईर प्रतिनिधित्व करतात. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या दरम्यान या मतदारसंघात त्यांनी अन्नधान्य वाटप केले. त्यानंतर निर्जंतुकीकरण, मास्क वा सॅनिटायझरचे वाटप करताना ते सतत नागरिकांच्या संपर्कात होते. स्वतः कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता आणि इतरांना धीर देत मदत मिळवून देण्यात छोटमशेट सर्वात पुढे होते. त्यामुळेच आज अनेकांना संकटावर मात करण्यात यश आले.

कार्यकर्त्यांचीही मदत

पहिल्या लाटेत अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रभाव फारसा दिसून आला नव्हता; परंतु दुसऱ्या लाटेत गावेच्या गावे पॉझिटिव्ह येऊ लागली. सासवणे, किहीम, बहिरोले, मापगाव आदी ठिकाणी रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर होम क्वारंटाईनबरोबरच रुग्णालयात दाखल करून घेणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली. अशा वेळी गरजूंना रुग्णवाहिका मिळवून देणे, रुग्णालयात दाखल झालेल्या अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. भोईर यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना याकामी मोलाची मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com