रेल्वेच्या आठ गाड्या कात टाकणार

संतोष मोरे
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या आठ गाड्या लवकरच कात टाकणार आहेत. या गाड्यांचा रेल्वेच्या उत्कृष्ट योजनेत समावेश केला आहे.

मुंबई - मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या आठ गाड्या लवकरच कात टाकणार आहेत. या गाड्यांचा रेल्वेच्या उत्कृष्ट योजनेत समावेश केला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन, एलटीटी ते मडगावदरम्यान धावणाऱ्या डबल डेकर एक्‍स्प्रेस, पुणे ते सीएसएमटी धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी मार्गावरील दुरांतो एक्‍स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी मार्गावरील सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस, मुंबई-अमरावती मार्गावरील अमरावती एक्‍स्प्रेस, पश्‍चिम रेल्वेच्या बिकानेर-वांद्रे टर्मिनस मार्गावरील रानकपूर एक्‍स्प्रेस आणि मुंबई सेंट्रल-बडोदा एक्‍स्प्रेस या गाड्यांचा समावेश उत्कृष्ट योजनेत केला आहे.

या असतील सुविधा...
या गाड्यांमध्ये जीपीएस प्रणाली, पीव्हीसी फ्लोअरिंग, वातानुकूलित कोचमध्ये आकर्षक रंगसंगती, नवे पडदे, एलईडी दिवे, अग्निशमन यंत्रणा, बायोटॉयलेट आदी सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच या गाड्यांची स्वच्छता क्‍लीन माय कोच, कोच मित्राअंतर्गत करण्यात येणार आहे.

Web Title: railway