
Mokhada Latest News: पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक या रेल्वे मार्गाची, अनेक दशकांची मागणी आहे. सदरची मागणी काही वर्षासाठी कालबाह्य झाली होती. मात्र, खासदार डाॅ हेमंत सवरा यांनी ही मागणी पुन्हा पुर्नजीवीत केली आहे. या रेल्वे मार्गाचे पुर्नसर्व्हेक्षण होणार आहे.
त्यासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डाॅ हेमंत सवरांनी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.