गणेशोत्सवानिमित्त ​​रेल्वे सोडणार आणखी 6 विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे आणि सावंतवाडी रोड या स्थानकांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता मध्य आणि कोकण रेल्वेने आणखी 6 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे आणि सावंतवाडी रोड या स्थानकांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.

पुणे-सावंतवाडी रोड-एलटीटी (01221) ( 2 फेऱ्या) ही ट्रेन 29 ऑगस्टला पुण्याहून रात्री 12.10 वाजता सुटणार असून पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवाशांसाठी (01222) सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी 5.20 वाजता सुटणार असून एलटीटीला दुपारी 4.50 वाजता पोहचणार आहे.

एलटीटी-सावंतवाडी रोड-पनवेल (01223) ( 2 फेऱ्या) ही ट्रेन 30 ऑगस्टला एलटीटीहून सायंकाळी 5.50 वाजता सुटणार असून सकाळी 6.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवाशांसाठी (01224) सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी 10.55 वाजता सुटणार असून पनवेलला रात्री 11.40 वाजता पोहचणार आहे. पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे (01225) (2 फेऱ्या) ही ट्रेन 31 ऑगस्टला पनवेलहून मध्यरात्री 12.55 वाजता सुटणार असून दुपारी 2.10 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवाशांसाठी (01226) सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी 3.20 वाजता सुटणार असून ती पुणे स्थानकात सकाळी 7.25 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधूदुर्ग, कुडाळ आणि झारप या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway department will leave 6 more special trains for Ganesh Festival