Railway Survey: 'पार्शल एसी लोकल'ला प्रवाशांची पसंती, जाणून घ्या सविस्तर

रेल्वेच्या सर्व्हेक्षणात प्रवाशांनी नोंदविले मत
AC-Local
AC-Localsakal media

मुंबई : एसी लोकल (AC Local) सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने (Railway Government) प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नुकताच एसी लोकलबाबत रेल्वे प्रशासनाकडून ऑनलाईन सर्व्हेक्षण (Online Survey) करण्यात आले. यामध्ये एसी लोकलबाबत प्रवाशांची मते (Travelers Opinion) जाणून घेतली. रेल्वे प्रवाशांनी सर्वाधिक पसंती पार्शल एसी लोकलला दिली आहे. पार्शल एसी लोकल म्हणजे एका लोकलला तीन किंवा सहा डबे एसीचे आणि इतर सामान्य डबे जोडण्याचे सर्व्हेक्षणात नोंद करण्यात आले आहे. ( Railway Government tries to start AC train for common people-nss91)

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलबाबत एकूण 37 हजार प्रवाशांनी मत नोंदविले. यामधील 40 टक्के प्रवाशांनी संपूर्ण एसी लोकलऐवजी पार्शल एसी लोकल धावावी. 12 किंवा 15 डब्यांच्या लोकलला 3 डबे एसीचे जोडावेत. तर, 30 टक्के प्रवाशांनी 12 किंवा 15 डब्यांच्या लोकलला 6 डबे एसीचे जोडण्याचे मत नोंदविले आहे.

AC-Local
CET: अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाची वेबसाईट बंदच, विद्यार्थी प्रतीक्षेत

मध्य रेल्वेवर पहिली ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल एसी लोकल सुरू केली. तर, कल्याण ते सीएसएमटी मार्गावरून दुसरी एसी लोकल सुरू केली. मात्र, नाॅन पीक अव्हर आणि जलद मार्गावर फेऱ्या, वाजवी तिकीट दर नसल्याने प्रवाशांनी एसी लोकलला पाठ दाखविली. यासह पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलचा प्रवाशांना उत्साहजनक प्रतिसाद नाही. त्यामुळे प्रवाशांची एसी लोकलबदल मत जाणून घेण्यासाठी समाज माध्यामावरून ऑनलाइन फॉर्म प्रसारित केला. यामध्ये 21 प्रश्न असलेला फॉर्म होता. यात यात 'होय' किंवा 'नाही' आणि कोणत्या मार्गाने प्रवास करता, एसी लोकलचे दर किती असावेत, फेऱ्या कोणत्या वेळी असाव्यात, अशा अनेक स्वरूपात माहिती प्रवाशांना भरायची होती.

प्रवाशांनी या सर्व्हेक्षणात संपूर्ण एसी लोकल चालविण्याएवजी पार्शल एसी लोकल चालविण्यात यावी. त्यामुळे एसी आणि नाॅन एसीमधील प्रवाशांना एकाचवेळी प्रवास करता येईल. पार्शल एसीच्या लोकल फेऱ्या वाढविण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्यावर देखील परिणाम होणार नाही. यासह 70 टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे तिकिट दर सर्वसामान्यांना परवडेल, अशाप्रकारचे ठेवण्यात यावे, असे मत नोंदविले. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलबाबतचे सर्व्हेक्षण रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com