रेल्वेचा मान्सूनपूर्व कामांचा दावा फोल, घाटात रेल्वेचे नुकसान

Railway
Railwaysakal media

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central railway) थळघाट आणि बोरघाटात जोरदार पाऊस पडणे, दरड कोसळणे आणि रेल्वे सेवा ठप्प होणे आता नित्याचे झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वेसेवा ठप्प होऊन (Railway stops) प्रवासी मेल, एक्स्प्रेसमध्ये अडकून राहून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तर, भीतीच्या छायेखाली प्रवाशांना (Travelers) प्रवास करावा लागतो. मध्य रेल्वे कोट्यवधी रुपये खर्च करून मान्सून पूर्व कामे करते. मात्र, मध्य रेल्वेने केलेल्या मान्सून पूर्व कामांची पोलखोल झाल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या घाट विभागात दरड कोसळू (Land slide) नये, यासाठी दरड स्कॅनिंग करणे, मजबूत जाळ्या बसविण्याची कामे केली होती. तरी, दरड कोसळून रेल्वेसेवा ठप्प होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ( Railway loss in central railway in mountain tracks even After pre monsoon work-nss91)

दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने डिसेंबर 2020 पासून घाट भागातील कामे करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कामाचा अंदाज, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात मार्च 2021 मध्ये कामाला सुरूवात केली. मध्य रेल्वेच्या 28 किमी लांबीच्या बोर घाटात 58 बोगदे आणि 14 किमी लांबीच्या थळ घाटात 18 बोगदे आहेत. मध्य रेल्वेने मान्सून पूर्व कामात कमकुवत दरडाची स्कॅनिंग करून सुरूंग लावून फोडणे, घाट भागात लोखंडी जाळ्या बसविणे, लहान-मोठ्या दरडची वाहतूक करण्यासाठी ट्रेन चालविणे, अशी कामे केली होती. तर, रेल्वे रूळांची, ओव्हर हेड वायरची देखभाल दुरूस्ती केली होती. मात्र, तरीही पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना कशा होतात ? मध्य रेल्वेच्या मान्सून पूर्व कामे करून देखील पावसाळ्यात अशा घटना होऊन प्रवाशांना वेठीस धरले जाते, याबाबत रेल्वे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला.

Railway
मुंबईत 'या' परिसरात सर्वाधिक सक्रिय रुग्ण, 5 वाॅर्डमध्ये रुग्णसंख्या अधिक

जोरदार पडलेल्या पावसामुळे बोरघाट आणि थळ घाटातील रेल्वे रूळांखालील खडी वाहून गेली. रूळावर माती साचली, पाणी तुंबले, झाडे पडले. त्यामुळे रेल्वे रूळांचे, सिग्नल यंत्रणेचे, ओव्हर हेड वायरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासह मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक, मालवाहतूकीला मोठा फटका बसल्याने मध्य रेल्वेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे कोट्यवधी रुपये खर्च करून मान्सून पूर्व कामे हाती घेते. मात्र, तरीही मान्सूनमध्ये प्रवाशांचे हाल होत असतील, तर रेल्वेच्या मान्सून पूर्व कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com