Railway News: भाडे व्यतिरिक्त महसूल कमाविण्यात मध्य रेल्वे आघाडीवर; कली इतक्या कोटींची कमाई

Railway News: भाडे व्यतिरिक्त महसूल कमाविण्यात मध्य रेल्वे आघाडीवर; कली इतक्या कोटींची कमाई
Railway Newssakal

Mumbai News: सलग तिसऱ्या वर्षी मध्य रेल्वे भाडे व्यतिरिक्त महसुलामध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व विभागामध्ये आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मध्य रेल्वेने भाडे व्यतिरिक्त महसुला अंतर्गत १२२ कोटी रुपयांहून अधिक विक्रमी महसूल गोळा केली आहे.(railway News)

मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १२२.३५ कोटी रुपयांच्या अभूतपूर्व उत्पन्न प्राप्तीसह भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक भाडे व्यतिरिक्त महसूल गोळा आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डाने निर्धारित केलेले १०२.८० कोटी रुपयांचे भाडे व्यतिरिक्त महसूलाचे उद्दिष्ट तर ओलांडलेच, पण मागील वर्षीच्या तुलनेत ३९.९२ टक्के अधिक उद्दिष्ट गाठले आहे मागच्या वर्षाची कमाई ८७.४४ कोटी रुपये आहे. (maharashtra railway News)

Railway News: भाडे व्यतिरिक्त महसूल कमाविण्यात मध्य रेल्वे आघाडीवर; कली इतक्या कोटींची कमाई
Pune Railway News : पुण्याहून १९६१ विशेष रेल्वे गाड्या ; तिकीटदर जास्त,उत्पन्नात वाढ

भारतीय रेल्वेला प्रवासी सेवेतून, मालवाहतूक, पार्सल वाहतूक करून महसूल मिळतो. यासह वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईद्वारे महसूल प्राप्त होते. तसेच भारतीय रेल्वेमध्ये भाडेविरहित (नॉन फेअर) महसुलात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. (indian Railway)

वूलू स्वच्छतागृहांची अंमलबजावणी, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा सुरू करणे, फार्मसीसह आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करणे, नॉन-कॅटरिंग वस्तूंसाठी वेंडिंग कॉन्ट्रॅक्ट, बॉक्सन वॅगनच्या स्वच्छतेचे कंत्राट या सारख्या योजना राबविल्या आहेत. याव्यतिरिक्त, भागीदारी आणि सहकार्याने महसूल निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अॅप आधारित कॅब सेवा, स्लीपिंग पॉड्स आणि सात वेगवेगळ्या ठिकाणी रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स सुरू केल्याने केवळ उत्पन्नाचे स्त्रोतच मिळाले नाहीत तर प्रवाशांना देखील फायदा झालेला आहे.(central Railway News)

Railway News: भाडे व्यतिरिक्त महसूल कमाविण्यात मध्य रेल्वे आघाडीवर; कली इतक्या कोटींची कमाई
Pune Railway News : पुण्याहून १९६१ विशेष रेल्वे गाड्या ; तिकीटदर जास्त,उत्पन्नात वाढ

.'व्होकल फॉर लोकल' अंतर्गत स्थानिक उद्योजकतेला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेवर ९१ ओएसओपी स्टॉल कार्यरत असून,आर्थिक वर्षात २.०७ कोटी रुपयांच्या २,४८,५२९ वस्तूं विकल्या आहेत.

दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, अमरावती, अकोला, शेगाव, नाशिकरोड आणि पुणे स्थानकात रेस्टॉरंट-ऑन-व्हील्स सुरु आहे. खानपान सेवेतून १०४.६२ कोटी रुपयांचा कॅटरिंग महसूल मिळाला आहे. मध्य रेल्वेने आयआरसीटीसीच्या सहकार्याने २३ भारत गौरव ट्रेनच्या फेऱ्या चालवल्या.त्यातून १०.२५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.अमृत भारत योजनेंतर्गत १७९३.०९ कोटी रुपये खर्चून ७७ स्थानकांचा 'अमृत स्थानक' म्हणून विकास करण्यात येत आहे.(Dadar, Lokmanya Tilak Terminus, Amravati, Akola, Shegaon, Nashik Road and Pune)

Railway News: भाडे व्यतिरिक्त महसूल कमाविण्यात मध्य रेल्वे आघाडीवर; कली इतक्या कोटींची कमाई
Railway News: रूळ ओलांडणाऱ्याना रोखण्यासाठी रेल्वेने हाती घेतली 'ही' मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com