रेल्वे पेपरफुटी प्रकरण; चौकशीच्या फेऱ्या केव्हापर्यत चालणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paper leak

रेल्वेच्या ज्युनिअर इंजिनियर पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित केले होते.

रेल्वे पेपरफुटी प्रकरण; चौकशीच्या फेऱ्या केव्हापर्यत चालणार?

मुंबई - रेल्वेच्या ज्युनिअर इंजिनियर पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे वृत्त सकाळने प्रकाशित केले होते. या बातमीची दखल घेत रेल्वेने चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या १५ दिवसांत ५० पेक्षा जास्त रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चौकशा झाल्या आहे. मात्र, रेल्वेचा चौकशीला १५ दिवसं होऊन सुद्धा चौकशीचा फेऱ्या थांबलेल्या नाही. त्यामुळे चौकशीला फेऱ्या केव्हापर्यत चालणार असा प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांना पडलेला आहेत.

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कार्यशाळेतील १६ ज्युनिअर इंजिनियर या पदासाठी लिखित परिक्षा झाली. १८ ऑगस्टला झालेल्या या परिक्षसाठी ८० रेल्वे कर्मचारी बसले होते. मात्र परीक्षेच्या काही दिवसापूर्वीच पश्चिम अधिकाऱ्यांनी पेपर लिंक केल्याची चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये होती. तसेच या संदर्भातील वृत्त सकाळने प्रकशित केले होते. या नंतर या प्रकरणात एकापाठोपाठ एक मोठे खुलासे झाले आहे. या वृत्ताची दखल घेत पश्चिम रेल्वेचा दक्षता विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, या परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असलेल्या १२ परीक्षा निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे. तसेच सर्व संशयीत रेल्वे कर्मचाऱ्यांची आणि २५ पेक्षा जास्त परिक्षा देणाऱ्या उमेदवाना चौकशी केली आहे. आता तर परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवारांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, चौकशी सुरु होऊन आज १५ पेक्षा जास्त दिवस उलटले आहे. मात्र, या प्रकरणा ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे रेल्वेचा कारभारावर कर्मचाऱ्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

चौकशीचा अहवालाची प्रतीक्षा -

चौकशीमध्ये कोणाला तरी वाचविण्याचे काम चौकशी पथक करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. चौकशी सुरु होऊन आज १५ दिवस झाले आहे. त्यामुळे अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र, चौकशी सुरु असल्याने रेल्वे प्रशासन कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.

प्रतिक्रिया -

ज्युनिअर इंजिनियर पदाच्या झालेल्या परीक्षेसंदर्भात सध्या चौकशी सुरु आहे. चौकशीच्या अहवाल आल्यानंतरच आम्ही यावर प्रतिक्रिया देऊन.

- परवेश शाहू, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक, लोअर परळ

प्रश्न कायमच?

१.परिक्षेत पास झालेल्या 21 उमेदवारांमध्ये एकाच विभागातील 14 उमेदवार?

२.परिक्षेसाठी चार प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला जातो. मात्र इथे केवळ एकचं प्रश्नपत्रिका तयार केली

३.निकालापुर्वी यशस्वी उमेदवारांची चर्चा

४.या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने का घेतल्या जात नाहीत?

५. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही बंद का?