
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर,डब्यांमध्ये किंवा रेल्वे परिसरात आढळून आल्यास अशा प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यामध्ये विनामास्क असलेल्या प्रवाशांना 200 रुपयाचा दंड आकारल्या जात आहे.
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर,डब्यांमध्ये किंवा रेल्वे परिसरात आढळून आल्यास अशा प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यामध्ये विनामास्क असलेल्या प्रवाशांना 200 रुपयाचा दंड आकारल्या जात आहे.
सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू राज्य सरकारने अनेक घटकातील प्रवाशांना सुद्धा लोकल प्रवासाला परवानगी दिली. त्यामुळे रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली आहे. मात्र, यादरम्यान कोविड 19 च्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश रेल्वेने दिले असतानाही प्रवाशांकडून प्रवासादरम्यान मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे.
अधिक वाचा- लहान मुलांवर लक्ष ठेवा, चार वर्षांच्या चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू
त्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या कारवाई मोहिमेत शुक्रवारी विविध ठिकाणी मिळून एकूण 43 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यामध्ये मुंबई सेंट्रल, अंधेरी, सीएसएमटी या स्थानकावरील सर्वात जास्त प्रवाशांवर ही कारवाई केली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
स्थानक | कारवाईची संख्या | एकूण दंडात्मक रक्कम |
सीएसएमटी | 10 | 2000 |
डोंबिवली | 2 | 100 |
कर्जत | 1 | 200 |
वाशी | 1 | 500 |
चर्चगेट | 1 | 200 |
मुंबई सेंट्रल | 12 | 2400 |
अंधेरी | 11 | 2200 |
बोरिवली | 2 | 400 |
पालघर | 3 | 600 |
एकूण | 43 | 9500 |
----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Railway police cracks down unmasked passengers in Mumbai