Railway Local News: पती गाडीतून उतरला, पत्नी आतच, घाबरून धावत्या लोकलमधून उडी मारली, इतक्यात पोलीस देवदूत बनला अन्...
Karjat Railway Accident: कर्जत रेल्वे स्थानकावर महिलेने धावत्या लोकलमधून उडी मारल्याचे समोर आले आहे. सुदैवाने महिलेचा जीव वाचला असून या घटनेत पोलीस कर्मचारी देवदूत ठरला आहे.
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकावर एका धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस जवानाने जीवाची बाजी लावली. वेळेवर घेतलेली ही धाडसी कृती आता सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.