महिलांना लोकल प्रवास देण्यासाठी रेल्वे तयार, लवकरच निर्णय होण्याची शक्यता

समीर सुर्वे
Tuesday, 20 October 2020

महिलांच्या लोकल प्रवासासाठी रेल्वे सकारात्मक असून, या सदर्भात लवकरचं निर्णय होण्याची शक्यता आहे

मुंबई : महिलांच्या लोकल प्रवासासाठी रेल्वे सकारात्मक असून, या सदर्भात लवकरचं निर्णय होण्याची शक्यता आहे. याबद्दल रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 18 ऑक्टोबर रोजी महिलांच्या प्रवासाबद्दलच्या नियोजनाची बैठक सुद्धा पार पडली असून, राज्य सरकारकडून रेल्वे स्थानकावरील गर्दी, कोरोना सबांधित नियम आणि उपाययोजनेसह प्रस्ताव आल्यास लोकलमध्ये महिलांना प्रवास देता येणार असल्याचे पश्चिम रेल्वे चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने घटस्थापनेचा मुहूर्त साधत 17 ऑक्टोबरपासून सकाळी महिलांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी दिली होती. पण रेल्वेने यासंदर्भातील एवढ्या कमी वेळात नियोजन करणं कठीण असून, रेल्वे मंत्रालयाच्या परवानगी शिवाय हा निर्णय घेणे शक्य नाही असं सांगत महिलांना प्रवासाची परवानगी नाकारली होती. या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटले होते. रेल्वे प्रवासी संघटनांनी या रेल्वेच्या निर्णयावर टीका केली होती. 

महत्त्वाची बातमी राज ठाकरे पोहोचलेत लिलावातीमध्ये, ठाकरे कुटुंबियांसाठी भावुक क्षण

त्यानंतर रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये  या संदर्भात सविस्तर बैठका झाल्या. या बैठकानंतर हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. महिलांसाठी लोकल सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका आणि स्थानकावरील गर्दीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या कोविड 19 अंतर्गत संपूर्ण उपाययोजनासहित प्रस्ताव आल्यास महिलाना लोकल प्रवासाचा दिलासा मिळणार असल्याचे ही पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ठाकूर यांनी सांगितले आहे. 

तर कार्यालयीन वेळेत अद्याप कोणतेही आदेश किंवा प्रस्ताव आला नसल्याचे  मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी सांगितले.

railway is positive for allowing women to travel in the local trains


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway is positive for allowing women to travel in the local trains