esakal | सहनशक्ती संपली; प्रवासी संघटनेचे आता विनातिकीट लोकल प्रवास आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai train

सहनशक्ती संपली; प्रवासी संघटनेचे आता विनातिकीट लोकल प्रवास आंदोलन

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : लोकल सेवा (Mumbai Train) बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे ( Travelers) प्रचंड हाल झालेत. मागील तीन महिन्यांपासून नागरिक पर्यायी वाहनांचा (private vehicles) वापर करून इच्छितस्थळ गाठत आहेत. नागरिक अनेक त्रासाला सामोरे जाऊन प्रवास करत आहेत. मात्र, नागरिकांची सहनशक्तीची क्षमता संपली असून आता आंदोलनाची (Strike) भूमिका घेतली आहे. विविध पक्ष, रेल्वे प्रवासी संघटनांनी (railway travelers union) लोकलमध्ये शिरून प्रवास करून नियमभंग आंदोलन सुरू केले आहे. तर, मंगळवारी, (ता.27) रोजी विनातिकीट लोकल प्रवास आंदोलन (Without ticket travel) करण्यास केले जाणार आहे. ( Railway travelers union without ticket strike for Mumbai train traveling for all- nss91)

हेही वाचा: मंत्रालयातील बैठकीबाबत पालकांची आग्रहाची मागणी, जाणून घ्या सविस्तर

नुकताच सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासाठी आझाद समाज पार्टी यांच्यावतीने लोकलमध्ये प्रवास करून नियमभंग आंदोलन केले. तर, जनता दल सेक्युलर पार्टी, भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवाशांची परवानगी द्यावी, असे आंदोलन केले. यासह मंगळवारी, (ता.27) रोजी जनता दल सेक्युलर पक्षाच्यावतीने लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करून आंदोलन केले जाणार आहे. जनता दल सेक्युलर पक्षाच्यावतीने 'लोकल सुरू करा, मुंबईकरांना वाचवा' अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार आहे. सायंकाळी 4 वाजता

रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकावरून प्रवासी चर्चगेटपर्यंत विनातिकीट प्रवास करणार आहेत, असे जनता दल सेक्युलर पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांनी दिली.कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे रेल्वे प्रवासी संघटनेकडून वारंवार केली. मात्र, ही मागणी सरकारने अद्याप पूर्ण केली नाही, याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेने संताप व्यक्त केला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी लोकलमधून विनातिकिट प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेद्वारे केले आहे.

loading image
go to top