वाहतूक पोलिसांवर हात उचलणं आता पडेल महागात, थेट परवाना रद्द करण्याची तरतूद

सुनीता महामुणकर
Friday, 6 November 2020

वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी वाहन चालकाचा परवाना रद्द करणारी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात येणारेत.

मुंबई: वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी वाहन चालकाचा परवाना रद्द करणारी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात येणारेत.  मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या वाढत्या हल्यांबाबत चिंता व्यक्त करणारी जनहित याचिका नागपूर उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याचिकेमध्ये राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र बुधवारी दाखल करण्यात आले. यानुसार गृह विभागातील अधिकाऱ्यांची मुख्य सचिवांसह एक बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पोलिसांवरील हल्ल्यांबाबत चर्चा करण्यात आली. 

मोटार वाहन कायदा 1998 मध्ये योग्य त्या दुरुस्ती करुन नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर फौजदारी कारवाई करणे, मारहाण करणाऱ्याचे परवाना तात्पुरता कालावधीसाठी निलंबित करणे, मोठा दंड आकारणे आदी पर्यायावर चर्चा करण्यात आली. कायद्यात दुरुस्ती करुन परवाना रद्द करणे, चांगल्या वर्तनाची हमी घेणे, फौजदारी दंड संहितेत सुधारणा करुन प्रकरण लवकर निकाली काढणे यावर आता भर दिला जाणार आहे. गृह विभागाचे उपसचिव युवराज अजितराव यांनी प्रतिज्ञापत्र केले आहे.

तसेच पोलिसांना कॅमेरे देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात दोनशे बॉडी कॅमेरे प्रायोगिक तत्वावर लवकरच वापरण्यासाठी प्रारंभ करणार असल्याचे म्हटले आहे.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Raising hands with traffic police will now be costly license will be revoked directly


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raising hands with traffic police will now be costly license will be revoked directly