फडणवीसांसोबत आल्यामुळे लोकांना वाटेल 'एकवर एक फ्री'; राज ठाकरेंचा मिश्कील टिप्पणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis and Raj Thackeray

फडणवीसांसोबत आल्यामुळे लोकांना वाटेल 'एकवर एक फ्री'; राज ठाकरेंचा मिश्कील टिप्पणी

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून इतर पक्षातल नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत आहेत. आज देखील राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांच्या १२५०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी फडणवीसांसोबत व्यासपीठावर एकत्र आल्याबद्दल मिश्कील टिप्पणी केली. ( Raj Thackeray News in Marathi)

हेही वाचा: Congress: भाजपला केवळ काँग्रेसच आव्हान देऊ शकतं; पक्ष सोडून गेलेल्या आझाद यांचं विधान

नाटक संपल्यावरही अनेक लोक सभागृहात थांबलेत, म्हणजे आमची नाटकंही तुम्हाला आवडतात, हे कळलं असा टोला राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर लगावला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत वारंवार स्टेज शेअर करण्यावरही भाष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले की, प्रशांत दामले यांच्यासारखा माणूस युरोपमध्ये जन्माला आला असता तर या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहिले असते. आताच देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला हजेरी लावून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येऊन गेले. मागील काही दिवसांत दोन-चार कार्यक्रम सोबत झाले. त्यामुळे मी संभ्रमात होतो की, कार्यक्रमाला यावं की नाही. कारण उगाच लोकांना वाटायचं की, एकवर एक फ्री मिळतायत, अशी मिश्कील टिप्पणी राज यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.