
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या बेशिस्तपणावर आणि ट्रॅफिक समस्येवर चिंता व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एक छोटासा पण प्रभावी आराखडा सादर केला. मुंबईतील ट्रॅफिक, पार्किंग, रस्त्यांचा ताण आणि बेशिस्तपणा यावर त्यांनी ठोस उपाय सुचवले. “ट्रॅफिकची परिस्थिती पाहिली की तुमच्या देशाची परिस्थिती दिसते,” असे सांगत राज ठाकरे यांनी शहर नियोजनाच्या गरजेवर जोर दिला.