Raj Thackeray : राज ठाकरे औवेसी बंधूंवर पुन्हा बरसले; म्हणाले, कोणीही त्यांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज ठाकरे औवेसी बंधूंवर पुन्हा बरसले; म्हणाले, कोणीही त्यांना...

मुंबई : एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार अकबरुद्दीन औवेसी या बंधुंवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा बरसले आहेत. हिंदुंच्या देवतांवर केलेल्या एका टिपण्णीवरुन त्यांनी या दोघांना चांगलंच सुनावलं. तसेच वादग्रस्त विधानांबद्दल कोणी त्यांना माफी मागायला लावत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray hits back at Owaisi brothers Said nobody is going to ask him to apologize)

राज ठाकरे यांची मंगळवारी दादरमधल्या रविंद्र नाट्य मंदिराच्या सभागृहात सभा झाली. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी पहिलीच जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी कोणतीही बैठक होणार नाही. तसेच आपल्याला नाशिकला जायचंय, राज्यभराचा दौरा करायचाय असंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: अदानी समूह 'NDTV' विकत घेणार? सुरुवातीला मिळवणार 29.18 टक्के शेअर्स

राज म्हणाले, "दोन भाऊ ते ओवैसी. त्यातील एकजण आमच्या देवीदेवतांबद्दल बोलतो. आमच्या देवीदेवतांच्या नावांबद्दल हे लोक अनुद्गार काढतात. पण त्याला कोणी माफी मागायला नाही सांगत या देशात"

बाळासाहेबांचा वारसा चालवणार

या सभेत बोलताना राज ठाकरेंनी आपण बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणार असं सूचक विधान केलं. राज्यात ८ भारतरत्न आहेत. केवळ पुतळे उभे केल्यानं काय होतं? केवळ जयंती पुण्यातिथीला आठवण येते. आमचे महापुरुष आम्ही जातीत वाटून घेतले आहेत. प्रत्येकजण एकमेकांचे वाभाडे काढतो. खरंतर तुम्हाला वेगळं ठेवण्यासाठी हे सुरू आहे. वारसा हा वस्तूचा नसतो, वारसा विचारांचा असतो. तो पुढे चालवायचा असतो. मला बाळासाहेबांचा वारसा पुढं न्यायचाय, असं ते म्हणाले.

Web Title: Raj Thackeray Hits Back At Owaisi Brothers Said Nobody Is Going To Ask Him To Apologize

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..