का गेलेत राज ठाकरे शरद पवारांच्या घरी?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ची भेट घेतली. शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सिल्व्हर ओकमध्ये  ही भेट झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येतेय. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली अशीही माहिती समोर येतेय.

उद्या शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटायला दिल्लीला जाणार आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी पवारांची घेतलेली भेट म्हणजे नवीन राजकीय गणितांची नांदी आहे का ? अशी चर्चा आता रंगू लागलीये. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकिला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सरकारनं जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी असल्याची टीका अजित पवार यांनी केली. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करावी अशी मागणीही करण्यात आलीय. 

Webtitle : raj thackeray met sharad pawar at his resident in mumbai

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray met sharad pawar at his resident in mumbai