

chandrashekhar bawankule
esakal
निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावरून सत्ताधारी भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली आहे. मतदार याद्यांतील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे स्वतः या मोर्चाला लोकलने जात असल्याचे दृश्यही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, या आंदोलनावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केला आहे.