
देशपांडे, धुरींच्या जामिनावर सुनावणी; राज ठाकरेंनी बोलावली नेत्यांची बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आंदोलन केलं होतं. त्यावेळी महिला पोलिसाला धक्काबुक्की करत फरार झालेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुरी आणि देशपांडे दोघांनीही त्यानंतर पळ काढला. बेपत्ता असलेल्या दोन्ही नेत्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज(Sandeep Deshpande Santosh Dhuri Bail Plea) केला असून त्याच्यावर आज निर्णय होणार आहे. तसंच आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकही राज ठाकरेंनी बोलावली आहे. (Meeting of MNS leaders with Raj Thackeray)
हेही वाचा: संदीप देशपांडे अद्यापही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
मनसेच्या आंदोलनादरम्यान संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या नेत्यांनी महिला पोलिसाला धक्काबुक्की करत घटनास्थळाहून पळ काढला. तेव्हापासून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र ते अद्याप समोर आलेले नाही. या दोन्ही नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे.
हेही वाचा: संदीप देशपांडे यांच्याविरोधात गुन्हे
संदीप देशपांडे यांच्या चालकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाकडून १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या दरम्यान राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीदरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवती जात आहे.
Web Title: Raj Thackeray Sandeep Deshpande Mns Leaders Meeting Santosh Dhuri Bail Plea
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..