"मी भाषण केलं, मात्र मला गुन्हा कबुल नाही"; पंधरा मिनिटात वाशी कोर्टात काय घडलं

"मी भाषण केलं, मात्र मला गुन्हा कबुल नाही"; पंधरा मिनिटात वाशी कोर्टात काय घडलं

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी कोर्टाकडून सशर्त जमीन मंजूर करण्यात आला आहे. २०१४ च्या टोलनाका तोडफोड प्रकरणात राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यांच्या समन्सची मुदत संपल्यानंतर राज ठाकरे यांच्याविरुद्ध कोर्टाने वॉरंट जारी केलं होतं.

यानंतर आज राज ठाकरे नवी मुंबईत वाशी कोर्टात हजर झाले होते. राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याचं राज ठाकरेंच्या वकिलांनी सांगितलं. 

पंधरा मिनिटात वाशी कोर्टात काय काय घडलं  

"मी भाषण केलं, मात्र गुन्हा मला माझ्यावर लावण्यात आलेले आरोप मंजूर नाही" असं राज ठाकरे कोर्टात म्हणालेत. कोर्टात युक्तिवाद सुरु असताना राज ठाकरे यांना काही प्रश्न देखील विचारले गेलेत. एकूण पंधरा ते वीस मिनिटे राज ठाकरे हे वाशी कोर्टात होते. त्यापैकी आठ ते दहा मिनिटे राज ठाकरे हे विटनेस बॉक्समध्ये होते. राज ठाकरे येणार असल्याने राज ठाकरेंच्या वकिलांची फौज तसेच कोर्टातील कर्मचाऱ्यांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. मात्र माननीय कोर्टाने गर्दी कमी करण्यासाठी सर्वांना बाहेर जाण्याचे आदेश दिलेत. कोर्टातील गर्दी कमी झाल्यानंतर सुनावणीला सुरवात झाली.

सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांना विटनेस बॉक्समध्ये पाचारण करण्यात आलं. राज ठाकरे विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर कोर्टाने राज ठाकरे यांना त्यांचं नाव विचारलं गेलं. राज ठाकरे यांनी त्यांचं नाव सांगितल्यानंतर त्यांच्यावर कोणता गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याची कलमे सांगितली गेलीत. यानंतर राज ठाकरे यांना त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण करण्याचे आरोप आहेत हे देखील सांगितलं गेलं. आरोप सांगितल्यानंतर ते आरोप तुम्हाला मान्य आहेत का हे देखील कोर्टाने विचारलं.

यावर राज ठाकरे म्हणालेत की, "मी भाषण केलं मात्र मला गुन्हा कबुल नाही". यानंतर राज ठाकरे यांच्या जामिनाला विरोधी पक्षकाराच्या वकिलांकडून विरोध देखील केला गेल्याचं समजतंय. सदर बाब कोर्टाच्या बुकमध्ये घेऊन राज ठाकरे यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

त्यानंतर राज ठाकरेंच्या वॉलिकांकडून पुढील सुनावणीस राज ठाकरे यांना बोलावलं जाऊ नये अशी परवानगी मागितली गेली. ज्यालाही माननीय कोर्टाकडून परवानगी मिळालेली आहे.    

दरम्यान,  हा खटला पुढे सुरूच राहणार असून ५ मे रोजी याबाबतची पुढील सुनावणी होणार आहे. 

raj thackeray says i gave speech but i did not confess what happened in vashi court full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com