Raj Thackeray Birthday : जास्त आरडाओरडा करू नका, माझा नातू…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारलं

Raj Thackeray scolded MNS workers  mns chief raj Thackeray birthday on shivtirth Video Goes viral
Raj Thackeray scolded MNS workers mns chief raj Thackeray birthday on shivtirth Video Goes viral

Raj Thackeray Birthday : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज, १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. असेच भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी फटकारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी (१३ जून) रात्री शिवतीर्थावर अनेक कार्यकर्ते केक घेऊन पोहचले होते. या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने घोषणा सुरू केल्या. मात्र, राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना फटकारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

राज ठकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ येते मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यादरम्यान आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका... माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. यानंतर कार्यकर्ते सुद्धा शांत झाले.साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

Raj Thackeray scolded MNS workers  mns chief raj Thackeray birthday on shivtirth Video Goes viral
Jay Shri Ram in School : शाळेत 'जय श्रीराम' घोषणा; दहावीच्या ६ विद्यार्थ्यांच्या निलंबनवरून पालक संघटना आक्रमक

वाढदिवसानिमीत्त राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना खास अवाहन केलं होतं. या पोस्टमध्ये त्यांनी दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात असे म्हणाले होते.

Raj Thackeray scolded MNS workers  mns chief raj Thackeray birthday on shivtirth Video Goes viral
Eknath Shinde : "आम्ही दोघंही लोकांच्या मनात…"; जाहिरातीबाबत CM शिंदेंच्या विधानाने आश्चर्य

झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणा…

पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा, असे राज ठाकरे म्हणाले होते.

तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com