Raj Thackeray Hanuman Chalisa Row | कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होताच राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb and Raj Thackeray

कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होताच राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी काल संपला. त्याआधीच पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली. राज्यभरात मशिदींबाहेर पोलीस फौजफाटा तैनात आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. (Raj Thackeray Tweets Video of Balasaheb Thackeray)

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पहाटे अजानच्या वेळी हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर वाजवली. तर काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सज्ज होते. पण अजान झालीच नाही. यातच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुन्हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray Hanuman Chalisa Row)

Web Title: Raj Thackeray Shared Old Video Of Balasaheb Thackeray Over Loud Speaker Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray
go to top