
Lata Mangeshkar: राज ठाकरेंची लता दीदींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भावूक पोस्ट; म्हणाले, चिरंजीवी होणं...
मुंबई : भारताची गानकोकिळा दिवंगत लत मंगेशकर यांचा पहिला स्मृतीदिन या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लता दीदींच्या आवाजाला चिरंजीवी असं संबोधलं आहे. त्याचबरोबर नव्या पिढीसाठी संदेशही दिला आहे. (Raj Thackeray shares a post on Late Lata Mangeshkar on his first death anniversary)
राज ठाकरे म्हणतात, माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल. पण यापुढं कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तिकाचं आत ओढत राहिलं, शांत करत राहिल. चिरंजीवी होणं काय असतं हे जर मला विचारलं तर मी यालाच चिरंजीवी म्हणेन.
दीदींच्या आठवणी आहेत, राहतील. पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. त्यांच्या स्मृतींना माझं विनम्र अभिवादन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.