
मुंबई, 16 जुलै 2025: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांवर खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 5 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र मराठी माणसाच्या विजय मेळाव्यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, यावर राज ठाकरे यांनी ट्वीट करत स्पष्ट शब्दांत सांगितलं की, हा मेळावा राजकीय नव्हता, तर मराठी माणसाच्या विजयाचा उत्सव होता. युतीच्या चर्चांबाबत त्यांनी खडसावत खोट्या चर्चा पसरवण्याचा नवा पायंडा पडत असल्याची खंत व्यक्त केली.