
महाराष्ट्राच्या आजचा दिवस मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेत मराठी एकतेचा विजय साजरा होत आहे.
त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात ठाकरे बंधूंनी एकजुटीने आवाज उठवला, आणि त्यांच्या दबावामुळे महायुती सरकारने हा निर्णय रद्द केला. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण यातून नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांना टोला लगावला.