
डोंबिवली ( 28) : राजकीय टोलेबाजीने सभा गाजविणारे मनसे पक्ष प्रमुख आता क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत. डोंबिवली जवळील हेदुटणे गावात स्व. रतन बुवा स्मृती चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला यंदा प्रथमच राज ठाकरे हे उपस्थिती लावणार आहेत.
राज यांची तरुणाई मध्ये क्रेझ आहे. त्यातच आता ते क्रिकेटच्या मैदानात उतरून क्रीडा प्रेमींची मने जिंकणार आहेत. राज ठाकरेंची ही इनिंग म्हणजे पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना आहे का याची चर्चा शहरात सुरू आहे.