Raj Thackeray: "पुणेकरांची करवसुली थांबवा"; राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray: "पुणेकरांची करवसुली थांबवा"; राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पुणे महापालिकेनं अचानक शहरातील नागरिकांना मिळकत कर वसुलीच्या नोटीसा धाडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ही कर वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी करणार पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे. (Raj Thackeray writes letter to CM Eknath Shinde over Property tax notices to Pune People)

पुणे महापालिकेनं अचानक शहरातील नागरिकांना पूर्वलक्ष्यी प्रभावानं मिळकत कर वसुलीच्या नोटीसा धाडल्या आहेत. सन १९७० च्या ठरावानुसार, करपात्र मुल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणं मिळकतकरात काही सूट दिली जात होती. सन २०१९ ला ही सूट विखंडीत करण्यात आली.

हेही वाचा: Andheri Byelection: चुरस वाढणार! अंधेरीत मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

पण मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखापरिक्षणात एकही आक्षेप आला नसताना ही सूट विखंडीत का केली? तुर्तात या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असली तरी यावर कायमस्वरुपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.