परप्रांतीयांमुळे राज्याचं समीकरण बिघडतंय - राज ठाकरे

परप्रांतीयांमुळे  राज्याचं समीकरण बिघडतंय - राज ठाकरे

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण राज्याचं समीकरण बिघडतंय. दररोज बाहेरचे लोंढे इथे येतायत. त्यामुळे भूमिपुत्रांऐवजी त्यांच्यवर खर्च होतो. त्यामुळे राज्यावर खर्चाचा ताण येतोय. यावर सरकार काहीही करत नाही आणि त्यांना कुणी जाब विचारायला तयार नाही. या शब्दात राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या लोंढ्यांच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं. पाच वर्षानंतर आताच का हिच ती वेळ असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नवी मुंबईत राज ठाकरे यांनी पावसात तोफ धडाडली. मुंबईत सगळीकडेच पावसाची रिमझिम सुरु असताना राज ठाकरेंची सभा होते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकार आणि सरकारी कामकाजावर चौफेर टीका केली. राज्यात विरोधी बाकावर ताठ कण्याचा पक्ष बसणार नाही तोवर, सगळं सुरळीत होणार नाही. 


राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील सभेत कोणते मुद्दे मांडले : 

  • गेल्या पाच वर्षात सत्ताधार्यांनी जाहीरनाम्यात गोष्टी दिल्या त्या पूर्ण केल्या नाहीत. त्यानक काहीच पूर्ण करता आले नाही तरी देखील हे तुमच्यासमोर येऊन मत मागायची हिम्मत कशी होते
  • सकाळचं पाणी, दूध भाजीपाला या सगळ्या गोष्ठी प्रशासन ठरवतं. त्यामुळे जबाबदार व्यक्तीला निवडून द्या 
  • दररोज बाहेरचे लोंढे इथे येतायत, त्यामुळे भूमिपुत्रांऐवजी त्यांच्यवर खर्च होतो. त्यामुळे राज्यावर खर्चाचा ताण येतोय  
  • राज्यातील तरुण जेव्हा नोकऱ्यांसाठी वणवण फिरतो, तेव्हा कुठे असतात आमदार आणि खासदार 
  • राज्यातील उपलब्ध नोकऱ्या नोकऱ्या माझ्या महाराष्ट्रातील तरुणांना मिळायला पाहिजे असं म्हटल्यावर मला खलनायक ठरवलं गेलं 
  • गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 20 हजार परप्रांतीय नागरिकांना बाहेर हाकलले. पण कुठेच जास्त बातमी आलेली नाही. 
  • बाहेरून येणाऱ्या ओझ्यामुळे राज्याचं समीकरण बिघडलं आहे. याचा जाब विचारायला कोणी तयार नाहीत. 
  • टोल नाक्यावर मनसेने केलेल्या आंदोलनामुळे 78 नाके बंद झाले. पण शिवसेना-भाजपने जाहीरनाम्यात दिल्यानंतर ही टोल का सुरू आहे. 
  • तुम्ही मतदान गांभीर्याने घेत नाहीत, तुम्ही थंड आहात. काही करत नाहीत. निवडून दिलेल्यानं जाब विचारत नाहीत 
  • निवडून आल्यानंतर गजानन काळे इतरांसारखा वागायला लागला तर त्याला मी बाजूला काढेन 
  • सरकारचे राज्यावर लक्ष नाही 
  • पंजाब महाराष्ट्र बँकेतील ठेवी गायब आहेत. सरकार आणि केंद्र सरकार यावर काहीही भाष्य करत नाही. 
  • सरकारने पोलीस आणि सर्वसामान्यांचे हात आणि तोंड बांधलंय
  • महाराष्ट्रात काय चाललंय? भाजप आणि शिवसेना ताट वाट्या घेऊन फिरतात. राज्य भिकेला लागलंय का? युतीत आहात तर ताट नेमके 10 की 5 ते एकदा ठरवा
  • आताच भांडण होतात तर मग पुढे काय होईल.
  • राज्यात आणि केंद्रात ताट पाठ कण्याचा विरोधी पक्ष बसत नाहीत तो पर्यंत सुरळीत चालणार नाही.

WebTitle : raj thackeray navi mumbai public speech targets outsiders

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com