Rajnath Singh | केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांचा रश्मी ठाकरेंना फोन, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांचा रश्मी ठाकरेंना फोन, म्हणाले...

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांचा रश्मी ठाकरेंना फोन, म्हणाले...

sakal_logo
By
टिम इ सकाळ

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मुंबई डॉकयार्ड येथे INS विशाखापट्टणमच्या कमिशनिंगला उपस्थित होते. "इंडो-पॅसिफिक एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे आणि तो जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे,असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. हा मार्ग सुरक्षित ठेवणे हे भारतीय नौदलाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

राजनाथ सिंह मुंबईत आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभासाठी उपस्थित होते. यावेळी "संपूर्ण जग येत्या काही वर्षात आपली लष्करी शक्ती वाढवत आहे आणि संरक्षण बजेटवरील खर्च वाढेल. त्यासाठी केंद्र सरकारने स्वदेशी जहाज बांधणी केंद्राच्या विकासाकडे वाटचाल केली आहे," सिंह म्हणाले.

रश्मी ठाकरेंना फोन कॉल

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना फोन केला. त्यांच्याशी बोलून प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. संरक्षणमंत्र्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

loading image
go to top