Raj Thackeray Shivsena: राज्यात पालकमंत्री पदावरून युती सरकार मध्ये राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. काही जिल्ह्यांत महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. यावर मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे गटाला टोला हाणला आहे. .पालघर, रायगड, गडचिरोली यांची पालकमंत्री पद हवीत कशासाठी ? सेवा करायला की मेवा खायला ? हे राजकारण्यांना माहीत आहे. त्यामुळे जे काय चाललंय ते त्यांना लखलाभो असे म्हटले आहे. तसेच राजू पाटील यांनी ट्विट सुद्धा केले आहे.महायुती सरकारमधील पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले आहे. आशा लावून बसलेल्या अनेक मंत्र्यांची पालकमंत्री पदी वर्णी न लागल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळत आहेत. .MLA Raju Patil : शिंदे पिता पुत्रांचा राजकारण संपण्याची वेळ आली आहे.यावर आता मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की.. पालकमंत्री पद कुठलं पाहिजे गडचिरोली, पालघर, रायगड.. कारण रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतोय पालघरला.. गडचिरोलीला खदानी आहेत, हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की का मेवा खायचा हे आमच्यासारख्या राजकारणाला माहित आहे. लोकांना ते माहित नाही. डीपीडीसी मध्ये आम्ही पाहतो की केलेल्या मागण्या काही पूर्ण होत नाही. त्यामुळे ठीक आहे, जे काय चाललंय ते त्यांना लखलाभो.तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले यावरून सुद्धा मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील आपली प्रतिक्रिया देत सांगितले की.. आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे आणि ते असते तर आगरी समाजाला ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती .Raju Patil: ...यांच्या नियतमध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले.त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही तर पालकमंत्री असताना काय होणारे थोड्या आमच्या अपेक्षा होत्या परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत जसा धरण फक्त घोषणा झाली मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रागापोटी हे ट्विट केले आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.