Rajya Sabha Election : मुख्यमंत्र्यांनी मविआच्या आमदारांची उद्या बोलावली बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron : CM Uddhav Thackeray
Rajya Sabha Election: मुख्यमंत्र्यांनी मविआच्या आमदारांची उद्या बोलावली बैठक

मुख्यमंत्र्यांनी मविआच्या आमदारांची उद्या बोलावली बैठक

मुंबई : राज्यात आता राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत महत्वाचं मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Rajya Sabha Election CM Uddhav Thackeray convenes meeting of MLAs tomorrow)

मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीबरोबरच काँग्रेसनं देखील उद्या काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्य सभा निवडणुकीसाठीचे ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे निरिक्षक मल्लिकार्जुन खर्गे हे या बैठकीत काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानं आता निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये तसेच आपली मतं फुटू नयेत यासाठी सर्वच पक्ष काळजी घेताना दिसत आहेत. शिवसेनेनं आपल्या आमदारांसाठी हॉटेल बूक केलं असून सर्वांना बॅगा घेऊन या हॉटेलवर बोलावण्यात आलं आहे.