Dombivli Crime News : विष्णुनगर पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेतील मोठागावं येथून राकेश शंकर खोपटकर याला अटक केली. त्याच्याकडून ५००० रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागावं येथे गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या राकेश शंकर खोपटकर (वय 39) याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 5 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे.