esakal | प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचा मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचा मेळावा

प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचा मेळावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांचा मेळावा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. श्री नांदाई माता चार गाव पुनर्वसन समिती, जय हनुमान कराडी कोळी मच्छीमार संघटना वाघिवली आणि अखिल भारतीय किसान सभेतर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी वारंवार सिडको प्रशासनाकडे दाद मागितली. उपोषण केले, आंदोलने केली; मात्र अजूनही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सिडकोने प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या या लढ्याला बळकटी देण्यासाठी, आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी कोंबदभुजे येथील नांदाई माता मंदिरात सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे. 

प्रकल्पबाधित कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस आवश्‍यक प्रशिक्षण देऊन रोजगाराचे हमीपत्र द्यावे. विद्यार्थ्यांचा शालेय, महाविद्यालयीन, उच्च शिक्षणाची जबाबदारी सिडको प्रशासनाने घ्यावी. वाघिवली गावचे साडेबारा टक्के भूखंड जमीन शेतकऱ्यांनाच मिळावेत. सर्व विमानतळ बाधित गावांना साडेबावीस टक्के योजना लागू करावी. २०१३ च्या कायद्यानुसार मच्छीमारांना नुकसानभरपाई व इतर मागण्यांची पूर्तता करावी या मागण्या प्रलंबित असून, त्याव्यतिरिक्त घरबांधणीसाठी वाढीव अनुदान द्यावे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक बांधकामास तिप्पट क्षेत्र व नुकसानभरपाईचा लाभ द्यावा. घर बांधकामासाठी लागणाऱ्या आर्किटेक्‍चरची नियुक्ती करावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top